काल कॉलेज सुरु झाले म्हणून सनी निघून गेला. त्या आधी आठवडाभर आधी जिंकू गेला होता. घर एकदम खाली झाले. ऑफिस मधून आल्याबरोबर थोडे वेगळे वाटले. घर एकदम व्यवस्थित होते. दिवाणावर laptop नव्हता. चादर विस्कटलेली नव्हती. उशा व लोड आपापल्या जागी निमुटपणे बसलेले होते . सनी होता तेव्हा ते नेहमी एकमेकांच्या अंगा-खांद्यांवर विराजमान होऊन भांडणाऱ्या मुलांप्रमाणे आपापले कपडे (कवर) विस्कटून बसलेले असायचे. अवती भोवती वर्तमानपत्र चिवडा बांधून आणून चिवडा काढल्या नंतर त्या कागदाचे जे रूप असते त्या रुपात दिसायचे. पण आज तसे नव्हते. सर्व काही व्यवस्थित आपापल्या जागा पकडून एकदम शिस्तबद्ध होते. गेला महिनाभर असं पहायची सवय नसल्यामुळे काहीतरी चुकल्या चुकल्यासारखे वाटले. घर एकदम शांत होते. तीच शांतता खायला उठली.
हे असं चालायचंच असं मनाला समजावत थोडा relax झालो. तेवढ्यात ही म्हणाली--
'आज घर एकदम रिकामं रिकामं वाटते आहे. '
"हू...!"
"दिवसभराच काही करमत नाही."
"हू..."
"काय कराव काही सुचत नाही...."
"ती सिरीयल पहा न तुझी...."
"कोणती...?"
"जी तुला इतके दिवस सनी पाहू देत नव्हता..."
"ती पण पाहायचा आज मूड लागत नाहीये.. "
"का ...?"
"माहीत नाही..."
"मला माहिती आहे "
"सनीच कारण सांगाल...."
"मग ते नाही काय...?"
"तसंच काही नाही...ते कारण असेलही....पण नेमकं तेच कारण नाही...हे पण मला जाणवतेय."
"दुसरं कारणही मला माहिती आहे...आज तुला ती सिरीयल पाहायला कुणी विरोध करणारा नाही म्हणून....!"
"तसंही असेल कदाचित..."
"तसंही असेल नाही...तसंच आहे...माणसाचं मन हे असंच असते . ज्या गोष्टीला विरोध होतो तिकडेच ते धाव घेते...जे सहजपणे मिळत नाही, ते मिळविण्याच्या ते मागे लागते...जे मिळालेले असते त्याचा आनंद हा काही काळापुरता टिकतो...त्या नंतर आपलं मन पुन्हा नवीन काहीतरी मिळविण्याच्या मागे लागते...ते मिळवितांना विरोध झाला तर इर्षा वाढते...प्रयत्न वाढतात....आणि हे असं नेहमी व्हायलाच हवं...कुठलं तरी ध्येय ....कुठलं तरी उद्धिष्ट...मनामध्ये असलं पाहिजे.....माणसाच्या जिवंतपणाचा तो पुरावाच असतो...अन्यथा माणसाला जगायला काही कारणच राहणार नाही....काहीतरी हवंहवंसं वाटणं.....नव काहीतरी मिळवावस वाटणं ....त्यासाठी योग्य मार्गानं वाटेल ते करायची तयारी असणं.....यालाच जीवन म्हणतात....ज्याच्या मनात या उर्मी दाटून येत नाहीत तो माणूस ...माणूस नाही...त्याच्या जगण्याला काही अर्थ उरत नाही...आणि आपले इप्सित साध्य करताना थोडा जरी विरोध झाला तरी त्या विरोधाच्या विरोधात बंड करून उठणारच खरा माणूस.....!
बहिणाबाई चौधरी हेच सांगून गेल्या........
"मन वढाय वढाय .....उभ्या पिकातलं ढोर.....
किती हाकलं हाकलं ...फिरी येतं पिकावर..!"
No comments:
Post a Comment