"खूप दिवस झाले सवड मिळाली नाही. जेंव्हा सवड होती तेव्हा मूड लागला नाही. आज सवड आहे...मूड पण आहे. मनमोकळ्या गप्पा मारुयात..!" फोनवर तिकडून मित्राचा आवाज आला.
हा माझा लंगोटीयार...! याला नाराज करणं माझ्या जीवावर आलं होतं पण मी तेव्हा अत्यंत महत्वाच्या कामामध्ये गुंतलेलो होतो..
"काय काही विशेष..." मी त्याला तुटकपणे विचारलं...
"का..? तू काही कामात आहेस का ?"
लंगोटीयारच तो...त्यानं बरोबर पकडलं....!
"हो...मी तुला रात्री फोन करू का?" "असं कशाला...मी तुला रात्री फोन करतो....ठीक आहे...?" असं म्हणून त्याच्या उत्तराची वाट न पाहताच मी फोन ठेवला. पुन्हा डोकं चालू असलेल्या कामात घातलं.
"एवढे कसे हो तुम्ही तुसडे...?" एवढा वेळ निमुटपणे आमचे संभाषण ऐकत असलेल्या सौभाग्यवतीने आपला शेरा दिला..... कम..... प्रश्न विचारला.
"का..? काय झालं?" माझं कामातलं लक्ष पुन्हा विचलीत झालं .
"कुणाचा फोन होता?"
"सरदार चा...." मी शक्य तितक्या शांतपणे...!
"मग त्यांच्याशी दोन शब्द तर नीट बोलायचे की नाही....काय वाटलं असेल त्यांना..."
"काय वाटणार आहे...मी कामात आहे असंच वाटलं असेल...!"
"हेच ...हेच....तुमच्या ह्या अशा वागण्यामुळेच सर्वांशी वैर पत्कारा..!"
"वैर...? वैराचा कुठे संबंध येतो इथे...? काय वाट्टेल ते बोलू नकोस. "
"एवढा जिवलग मित्र तुमचा....काय वाटलं असेल त्यांना...स्वतः तर फोन करत नाही , समोरच्याने केला तरी बोलत नाही...अशाने सगळ्यांचा रोष ओढवून घ्या .....नातेवाईक तर तुटलेलेच आहेत , आता मित्रांनाही तोडून टाका....!"
"एवढं काही झालेलं नाही ...मी त्याला रात्री फोन करतो म्हणून सांगितलेलं आहे..."
"रात्री आठवण राहील तेव्हा ना..!"
"काही बिघडत नाही एवढं...माझा मित्र आहे तो...त्याला माझा स्वभाव चांगला माहिती आहे..."
"जन्मभर असं सगळ्यांना गृहीत धरत चला व शेवटी एकटे पडा...नाहीतरी तुम्ही एकलकोंडेच आहात म्हणा!"
"हे बघ मला माझं एवढं काम संपवू दे मग आपण या विषयावर वाट्टेल तेवढं बोलू ..." आता मी पूर्णपणे वैतागलेलो होतो.
तिने माझा मूड बघितला व ती तिच्या कामाला लागली. मी तिच्याकडे बघितलं नाही पण तिच्या चेहऱ्यावर नक्कीच "या माणसाला कोणीही सुधारू शकणार नाही " असेच भाव असणार...
तासाभरात मी माझं काम संपवलं...सगळे पेपर्स नीट ठेवले ..मग घरातला कानोसा घेतला. संध्याकाळचे सात वाजले होते...ही किचन मध्ये काहीतरी करत होती...कामाच्या ताणामुळे डोकं अगदी जड पडलं होतं...मन थकून गेलेलं होतं ...थोडं बाहेर फिरून यावं म्हटलं तरी बाहेर पडायची मुळीच इच्छा नव्हती. तसाच सोफ्यावर मान टाकून डोळे मिटून शांतपणे बसलो. थोडं बरं वाटलं.
तेवढ्यात ही चहा घेऊन आली.
"अरे वा...मला आता चहा हवाच होता...." मी खुशीत येवून म्हणालो.
"तुमच्या मनात काय ते ओळखून असतो आम्ही...तुम्हाला मात्र दुसऱ्याच्या मनाची काहीही पर्वा नसते..!"
हिला तो मघाचा विषय वाढवायचा होता. मी त्या मूडमध्ये नव्हतो. मी गप्प. मिनिटभर वाट पाहून ती निघून गेली. तिचा मूड गेलेला होता.
चहाचे घोट घेता घेता मला आठवलं ...मघाशी ती एक सुंदर वाक्य बोलली होती... "जन्मभर असं सगळ्यांना गृहीत धरत चला...."
गृहीत धरणे....खरच आपण आपल्या रोजच्या जीवनात कितीतरी गोष्टी गृहीत धरून चालत असतो. आता हेच पहा ना थोड्या वेळापूर्वी जेव्हा मला मित्राचा फोन आला होता तेव्हा त्याने मी त्याच्याशी मोकळ्या गप्पा मारेल असं गृहीत धरलं होतं. त्याउलट मी सुद्धा त्याला रात्री फोन करतो असं सांगून फोन ठेवला तेव्हा त्याला राग येणार नाही...तो माझी अडचण समजून घेईल हे गृहीत धरलं होतं. एवढंच नाही...दररोज आपण आपल्या नियमित जीवनात अनेक गोष्टी अश्याच गृहीत धरत असतो.
सकाळी उठून ब्रश केल्याबरोबर आपल्याला पत्नीकडून गरमागरम चहा मिळणार आहे हे आपण गृहीत धरलेलं असते...सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जातो तेव्हा समोरून ओळखीची व्यक्ती दिसताच त्याच्या ओठावर ओळखीचं हास्य आपण गृहीत धरलेलं असते... सकाळी सकाळीच रात्री गस्त घालणारा गुरखा जेव्हा आपल्याला कडक आवाजात "सलाम शाब" असं अभिवादन करतो तेव्हा या महिन्याचे त्याचे गस्तीचे पैसे अजून त्याला घरातून मिळालेले नाहीत व ते तो मागण्यासाठीच आला आहे हे सुद्धा आपण गृहीत धरलेले असते.
ऑफिसात गेल्यावर आपल्या हाताखाली काम करणारी मंडळी हसून अभिवादन करणार, आपण थोडे जरी उशिरा गेलो तरी बॉस हमखास "तिरप्या" नजरेने पाहणार, मग संध्याकाळी हमखास काहीतरी अवघड काम सोपवून आपल्याला उशीर करणार, आपल्या कामाचे वरिष्ठांनी कौतुक केले तर सहकारी मनातून जळणार पण वरवर मात्र आपली स्तुती करणार, अश्या असंख्य गोष्टी आपण सवयीने गृहीत धरत असतो.
गृहीत धरण्याची ही सवय आपली जुनीच असते. जुनी म्हणजे अगदी आपल्या जन्मापासूनची असते.
जेव्हा आपल्याला काही कळतही नसते तेव्हा सुद्धा आपण रडलो की आई आपल्याला दुध पाजेल हे आपण गृहीत धरूनच रडत असतो . थोडे रुसून बसलो की आई बाबा आपले हट्ट पुरविणार, बाबांकडून कुठली गोष्ट हवी असली की ती आईकडे मागावी म्हणजे बाबांना न मागताच ती आपल्याला मिळेल, बाहेर खेळायला जायचे असल्यास अर्धा तास आधी अभ्यास सुरु करावा म्हणजे मग आईकडून परवानगी हमखास मिळेल, नवे कपडे हवे असल्यास जुने कसे आखूड होतात हे सांगायला सुरुवात करावी म्हणजे नवे मिळतील, या व इतर अनेक गोष्टी आपण लहानपणी गृहीत धरलेल्या असतात.

या गृहीत धरलेल्या बाबी जर पूर्ण झाल्या नाहीत तर मग आपण निराश होतो..रागावतो...चिडतो व मग आपण आपल्या मनाचा तोल सोडतो. मग गैरसमज वाढतात.. चांगले संबध बिघडतात...एकंदरीत काय की जीवनातला आनंद कमी कमी होत जातो..
शालेय जीवनात असतांना भूमितीची गृहीतके शिकलो होतो.....भूमितीतल्या गृहीताकांसारखी जीवनातली ही वर सांगितलेली गृहीतके प्रत्येक वेळी खरी ठरतीलच असे नाही...जीवनातल्या गृहीतकांमध्ये व भूमितीच्या गृहीतकांमध्ये हाच मोठा फरक आहे...भूमितीची गृहीतके प्रत्येक वेळी खरी ठरतात . ती अचूक असतात. पण जीवनातल्या गृहीताकांचे असे नाही. ती व्यक्तिपरत्वे बदलू शकतात. म्हणूनच जीवनात आपले सर्वच अंदाज अचूक नसतात..
जीवनात यशस्वी होण्यासाठी जीवनातल्या ह्या गृहीताकांचा सखोल अभ्यास असणे आवश्यक असते...कुणाशी कधी कसं व काय बोलावं हे समजलं पाहिजे. कुठे कसं वागावं याची पुरती जाण असावी. कुठल्या कामाला कधी किती महत्व द्यावे हे समजलं पाहिजे...समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज असावा....दुसऱ्यांच्या भावना ओळखता याव्यात....अश्या असंख्य गोष्टी....घटना....अनुभव....यातून मनुष्य जीवनातल्या गृहीतकांमध्ये पारंगत होतो...मग अश्यावेळी यशोशिखर दूर नसते...!